शेतकऱ्यांची न्याय यात्रा झरी मध्ये दाखल

0
79

रॅलीचे जनेते कडून जंगी स्वागत

राज्य सरकार व केंद्र सरकार यांची पोलखोल

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी शेतकरी जन यात्रेचे आयोजक आशिष भाऊ खूळसंगे व काँग्रेस पक्षाचे नेते वामनरावजी कासावर यांचे मार्गदर्शनाखाली वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगाव तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधून सरकारची पोलखोल करण्यात आली झरी येथे जन यात्रेची रॅली  बिरसा मुंडा चौकात पोहोचली आणि बिरसा मुंडा फलकाचे आशिष भाऊ खुलसंगे त्यांचे हस्ते पूजन करण्यात आले व चौकामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले.

असुन त्या यात्रेचे झरी येते स्वागत करण्यात आले व केंद्र सरकार व राज्य सरकार यांची खोल खोल करण्यात आली सरकारची  शेतकऱ्यावर लक्ष नाही अनेक संकटे आणलीत शेतकरी वर्ग हवादिल झाला आहे.उभ्या शेतातून पूर वाहने,शेतमालाला योग्य भाव न भेटणे, शेतात जायला पांदण रस्त्याची ‘अडचण, उत्पन्नापेक्षा बियाणे, खतांचे भाव वाढले,परंतु शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देण्यास आघाडी सरकार पूर्णता अपयशी ठरले.यासाठी येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्यान निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले.

झरी तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लागलेले नाही या तालुक्यामध्ये रस्त्याची समस्या भेडसावध असून येथील लोकप्रतिनिधीचे मात्र या विषयाकडे दुर्लक्ष होत आहे आयोजक आशिष भाऊ खुलसंगे यांनी वेळोवेळी या तालुक्यातील समस्येचा निराकरण करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला व आज सुद्धा तालुक्यातील समस्येचे निराकरण व्हावे याकरिता शेतकरी जन यात्रेचा आयोजन केले आहे.व यात्रेमध्ये झरी तालुक्यातील व झरी वासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

त्यावेळेस यावेळी माजी आ.वामनराव कासावार, झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष खुलसंगे,मध्यवर्ती बँकेचे माजी,वणीविधानसभा क्षेत्राची युवा अध्यक्ष राहुल दांडेकर निलेशभाऊ एलटीवार हरिदास गुजलवार संदीप बुरेवार भुमारेडडी बाजांलावार,प्रकाश कासावार, राजूभाऊ एलटीवार यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक, सुनील ढाले सर, प्रकाशराव मॅकलवार, राजीव कासावार, राजू उपरे गिरीधर उईके रमेश संकसनवार शेखर बोनगींवार महेश सिद्धमवार अनिल मॅनरवार वणी येथून अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.व सदर यात्रा गवार पिवरडोल मांडवी टाकली देमाडदेवी व पाटण येथे प्रस्थान झाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here