शेतकऱ्याच्या मुलाची पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड

0
116

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या मुलाची नांदेड पोलीस मध्ये नियुक्ती झाली त्या मुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तालुक्यातील छोटेसे गाव पहापळ येथील सुपुत्र गजानन पुंडलिक ठावरी यांची पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल पदी निवड झाली.गजाननचे वडील शेतकरी आहे.त्यांच्याकडे 4 एकर शेती आहे.आई -वडील शेतीचे कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

गजानन हा सन 2016 पासुन मारेगाव पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून काम करत होता व शेतात कुटुंबाला हातभार लावत होता.नुकतीच गजाननची पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र आले.हे पत्र येताच कुटुंबियांना फार आनंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here