सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या मुलाची गोंदिया राज्य राखीव पोलीस बल (SRPF) मध्ये नियुक्ती झाली त्या मुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तालुक्यातील छोटेसे गाव केगाव येथील सुपुत्र अमित राजेश दुर्गे यांची राज्य राखीव पोलीस बल (SRPF) पदी गोंदिया येथे निवड झाली. अमित चे वडील शेतकरी आहे.त्यांच्याकडे 10 एकर शेती आहे.आई -वडील शेतीचे कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

अमित हा सन 2019 पासुन मारेगाव येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेमध्ये गेल्या पाच वर्षापासून सतत तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता अथक परिश्रमा नंतर त्याने यश संपादित केले आहे.व तो शेतातील कामात कुटुंबाला हातभार लावु लागत होता.नुकतीच अमितची राज्य राखीव पोलीस बल (SRPF) पदी गोंदिया मध्ये नियुक्ती झाल्याचे पत्र आले.हे पत्र येताच कुटुंबियांना फार आनंद झाला.