पहापळ येथील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 2 नोव्हेंबर 2024 रोज शनिवारला सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव अर्जुन भाऊराव काळे वय अंदाजे 45 वर्षे रा.पहापळ असे आहे.अर्जुन यांचे कडे 3 एकर शेती आहे.ते शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.त्याने आज त्याच्या मोठ्या भावाच्या शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

कुटुंबातील काही सदस्य शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली.त्यांनी घटनेची माहिती लगेच पोलीस पाटील यांना दिली त्यांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.मृतक यांचे पश्चात पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शखाली जमादार आनंद अलचेवार करीत आहे.