पांडवदेवी येथे यात्रेला जात असताना दुचाकीचा झाला होता अपघात
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चोपण येथील 3 व्यक्ती काल सकाळी 10 वाजता पांडव देवी येथे यात्रेसाठी जात असताना खडकी बस थांबा जवळ एका अज्ञात पिकअप वाहणाने त्यांच्या दुचाकीला कट मारल्याने झाला होता अपघात.
त्यामध्ये रवींद्र हरिदास जोगी वय अंदाजे 39 वर्ष,संदीप बादलशाही कुडमेथे वय 50 वर्ष रा.चोपण हे गंभीर जखमी झाले होते तर शालिक चेंडकू जुनगरी वय 35 वर्ष हा किरकोळ जखमी झाला होता.ते काल दिनांक 2 नोव्हेंबरला 2024 रोज शनिवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास MH-29 AX- 3682 या दुचाकीने पांडव देवी येथे जात होते.

त्यांचा अपघात घडताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी मदत करत त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केले होते पण चंद्रपूर येथे रात्री उपचारादरम्यान रवींद्र हरिदास जोगी,संदीप बादलशाही कुडमेथे यांचा मृत्यू झाला.
संदीपच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली तर रवींद्रच्या पश्चात आई,वडील,पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे. संदिपवर ओसरला येथे तर रवींद्र जोगीवर चोपण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.