Sunday, December 29, 2024

ब्रेकिंग न्युज

Related Posts

ब्रेकिंग न्युज

ढगाळ वातावरणाने तुर पीक धोक्यात

Post Views: 318

किडीचा सुध्दा प्रादुर्भाव : शेतकरी हवालदिल

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यात ५ हजार ४०० हेक्टर वर तुरीची लागवड करण्यात आली असुन तुर बहरली.परंतु मागील तीन दिवसापासून वातावरण ढगाळ असल्याने याचा परिणाम थेट तुरीच्या पिकांवर जाणवायला लागला असुन किडींचा सुध्दा प्रादुर्भाव असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यावर नेहमीच संकटाची टांगली तलवार असते.वातावरणात होणारा बदल जर कोणाला जाणवत असेल तर तो सर्वात आधी शेतातील पिकावर जाणवायला लागतो.अशीच परिस्थिती आज तुरीच्या उभ्या पिकावर येऊन ठेपली आहे. ढगाळ वातावरणामुळे फुलगळ व किडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली आहे.

या वातावरणाचा मोठा फटका शेतकऱ्याना बसणार असल्याचे दिसत असुन त्यामुळे मात्र उभे पीक पुन्हा हातुन जाणार ही भिती शेतकऱ्यांना सतावत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसायला लागले आहे.अशा वातावरणामुळे निर्माण झालेली कीड सुद्धा शेतकऱ्यांसमोर  मोठा प्रश्न आहे.

गळणारी फुले व कीड यावर कोणताही उपाय नसल्याने या समस्येला सामोर जायचे तरी कसे? पीक कसे वाचवावे याकरिता जगाच्या पोशिंद्याची धावपळ सुरू आहे.आधीच तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि त्यात ढगाळ वातावरणामुळे हाती येणाऱ्या पिकापासून मुकावे लागते की काय,अशा परिस्थितीत आज शेतकरी सापडला आहे.

मारेगाव तालुक्यात ४४४२४ हजार हेक्टर कृषी क्षेत्र आहे.त्यात ५ हजार ४०० हेक्टर वर तुर पीक असुन ढगाळ वातावरणाने चांगलाच विपरीत परीणाम होत आहे.तालुक्यातील शेत शिवारातील तूर या पिकावर शेंगा पोखरणाऱ्या,पिसारा पतंग आणि शेंगे माशीनी आक्रमण केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असुन संकटाची मालीका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने कपाशी,सोयाबीन,व आता तुरही हातची जाणार त्यामुळे परत एकदा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

प्रतिक्रिया..
तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की,सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे तुर या पिकांवर अळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या मुळे सर्व शेतकऱ्यांनी तुरीवर कीटनाशकांची एक फवारणी करून घेण्यात यावी.तसेच धुके/धुई मुळे तुर पिकावरील फुलगळ टाळण्यासाठी शेताच्या धुऱ्यावर काडी कचरा, पाला पाचोळा गोळा करून धुर करावा.मर रोगाची लागण झालेली झाडे उपटून काढावी व शेताबाहेर नेऊन जाळावीत तसेच ट्रायकोडर्मा व बुरशीनाशकाचे (५०० ग्रॅम ५ लिटर पाण्यात मिसळून) द्रावण त्या ठिकाणी व लगतच्या झाडांना द्यावे.पूर्वी मर रोग प्रादुर्भाव झालेल्खा शेतात पुढील ३ वर्षे तूर लागवड करू नये अशा क्षेत्रात तृणधान्य पिके घ्यावीत.फायटोप्थोरा करपा रोग दिसताच मेटालॅक्सिल ४ ज टक्के. मॅकोझेब ६४ टक्के डब्लूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर प्रामुख्याने खोडावर व फांद्यावर फवारणी करावी. आवश्यक भासल्यास ८ ते १० दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.कु.डी.जि. खवले तालुका कृषी अधिकारी मारेगाव

सुरेश पाचभाई
सुरेश पाचभाईhttps://spnewsmaregaon.com
मुख्य संपादक Phone: 9922862184 SP न्यूज मारेगांव हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजिटल स्वरूपातील ऑनलाईन न्युज पोर्टल असून या माध्यमाद्वारे परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या, सामाजिक व राजकीय, विश्लेषणात्मक बातम्या आणि महाराष्ट्र, देश, क्रीडा, कृषी, मनोरंजन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित जनते पर्यंत पोहचविण्याचा एकमेव उद्देश आहे. " घडावा देश, हाची उद्देश , ....... आवाज जनतेचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Popular Articles