सावंगी शिवारात महसूल विभागाची धडाकेबाज कारवाई
अंदाजे तेरा ब्रास रेती जप्त
प्रमोद रा.मारेगाव
रेतीचे अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करीत असताना एका ट्रकवर मारेगाव महसूल विभागाने कारवाई केली.यात अंदाजे तेरा ब्रास रेती जप्त करण्यात आलेली आहे. ही घटना तालुक्यातील सावंगी शिवारात घडली.
मारेगाव तालुक्यातील सावंगी घाटामधून रेतीचे अवैधपणे उत्खनन करून वाहतूक करण्यात येत असल्याची कुणकुण मारेगाव महसूल विभागाला लागलेली होती.त्या अनुषंगाने मारेगाव येथील महसूल विभागाने सापळा रचित एका ट्रकवर रेतीची अवैधपणे वाहतूक करत असताना धाड टाकून पकडले. यात अंदाजे तेरा ब्रास रेती जप्त करण्यात आलेली आहे.
आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला सकाळी 8:30 वाजताच्या दरम्यान एका मोठ्या ट्रकमध्ये अवैधपणे रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.यावरून मारेगाव येथील तहसीलदार उत्तम निलावाड हे आपल्या ताफ्यासह तेथे दाखल झाले. आणि त्या ट्रकमध्ये असलेली अंदाजे 13 ब्रास रेतीसह ट्रक जप्त करून मारेगाव तहसील कार्यालयामध्ये आणण्यात आला.यावेळी तलाठी वानखेडे, शिंगणे,गुनावंत,कुडमेथे, विकास मडावी,कोतवाल दिलीप पचारे उपस्थित होते.
https://www.instagram.com/er.sureshpachbhai/profilecard/?igsh=MXR6ZjJybnF4dmdyNQ==