मारेगाव पोलिसांनी केले आरोपीस गजाआड
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील एका गावातील मुलगी नवरगाव येथे सामने पहावयास आलेली मुलगी नळावर पाणी पिण्यास गेली असता एका युवकाने तिचा हात पकडून छेडखानी केली. सदर घटनेची मुलीने मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार करताच मारेगाव पोलिसांनी आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.
तालुक्यातील नवरगाव (धरण)येथील पंचशील विद्यालय येथे क्रीडा सामने सुरू आहेत. त्या मुळे नवरगाव केंद्रातील अनेक शाळा तेथे सहभागी झालेल्या आहेत. हे सामने बघण्यासाठी सदर मुलगीही नवरगाव येथे गेलेली होती. तिथे सगणापुर येथील आशिष रमेश धानोरकर वय 19 हा सुद्धा गेलेला होता.
पीडित मुलगी सामने बघून पाणी पिण्यासाठी नळावर गेली असता आशिष रमेश धानोरकर हा सुद्धा नळावर गेला आणि तिचा हात पकडून तू माझ्याशी बोलत का नाहीस, तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी तुझी इज्जत चारचौघात काढीन अशी धमकी दिली.यापूर्वी सुद्धा आरोपीने सदर मुलीची छेडखानी काढलेली होती.
घडलेला प्रकार पीडित मुलीने घरी जाऊन आपल्या भावास सांगितला.भावाने काल दि.19 डिसेंबर 2024 रोज गुरुवारला मारेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आशिष धानोरकर विरुद्ध कलम 74, 75, 78,BNS सहकलम 8, 12,बा. लै.अ.प्र.सहकलम 3(1)W(i), कलम 3(1)(W) (ii)3(2)(va)अ. जा. ज. अ. प्र. का.नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामेश्वर वैजने पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय सोळंके करीत आहे.