हटवांजरी येथील जीवनविकास माध्य व उच्च माध्य विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

0
921

आज सायंकाळी 7 वाजता स्नेहसंमेलनाचे आयोजन

सुरेश पाचभाई मारेगांव

मारेगांव तालुक्यातील हटवांजरी येथील जीवनविकास विद्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेह संमेलन आज दिनांक 24 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला सायकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे.

या कार्यमाचे अध्यक्षस्थानी कुंदनकुमार पी.महाजन (अध्यक्ष) जीवनविकास ब. सा. संस्था तर उद्घाटक स्वातीताई कुंदन महाजन (संचालिका) जीवनविकास ब. सा. संस्था घाटंजी, प्रमुख अतिथी सौ.प्रिया गणेश कुळमेथे सरपंच ग्राम पंचायत हटवांजरी,निखिल पी.कालेकार उपसरपंच, ग्रा.पं.हटवांजरी,अनिरुद्ध माथनकर पोलीस पाटील हटवांजरी,मोहनराव ठाकरे सर मुख्याध्यापक.जी.प.शाळा हटवांजरी,

मनोज लांजेवार सर जि. प. सराटी (स. शिक्षक),मुकेश महाडूळे सर मुख्याध्यापक / प्राचार्य जीवनविकास विद्यालय हटवांजरी,सर्व शिक्षक व कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित राहणार असुन विद्यार्थी आपल्या कलागुण सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या मध्ये नृत्य, नकला, नाटक असे वेगवेगळे प्रकार सादर करणार असुन या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान शाळेमार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here