जगण्याच्या विविध कौशल्यांसह,एक्स्पर्ट व्हा बेसीक इंग्लिशमध्येदेखील
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील आणि अनाथ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणूनच उन्हाळी संस्कार शिबिर व स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजी संभाषणाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. इयत्ता ३ री ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतचे सर्व विद्याथी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, गृहिणी, विद्यार्थी,विद्यार्थीनी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी हे शिबिर अत्यंत सोयीचे आहे.
हे शिबिर मारेगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे होईल. मारेगाव परिसर हा शेतकरी आत्महत्यांनी हादरलेला आहे. अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील इच्छुक विद्यार्थ्यांना या शिबिरात वणीतील स्माईल फाउंडेशनच्या वतीने मोफत प्रवेश राहील.
या शिबिरात बेसिक इंग्लिश म्हणजे पायाभूत इंग्रजीवर भर देण्यात येईल.इंग्रजी बोलण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या शिकवण्यात येतील. विद्यार्थ्यांकडून बोलण्याचा सराव करून घेण्यात येईल.नोंदणी ७०३८२०४२०९ या मोबाईल नंबरवर 16 एप्रिल ते 22 मे दरम्यान करता येईल.

या शिबिरादरम्यान प्रत्येक शिबिरार्थ्याला प्रिंटेड नोटस् देण्यात येतील. सोबतच प्रत्येक शिबिरार्थ्याला रोजच्या प्रशिक्षणाच्या ऑडिओ क्लिप्स स्मार्टफोनवर पाठवण्यात येतील.या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल.
नेतृत्त्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ सराव आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील.
शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील.यात शिबिरार्थ्यांसाठी सहल होईल.शिबिरात इनडोअर,आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य,अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीकरण होईल.
अधिक माहितीसाठी सागर जाधव यांच्याकडे ७०३८२०४२०९ या नंबरवर सकाळी 11ते 8 वाजेपर्यंत करता येईल. तेव्हा या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.