वेगाव येथील शेतशिवारातील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
वेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली. दीपक भास्कर रामटेके वय अंदाजे 25 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
दीपक हा ब-याच दिवसापासुन आजारी होता.त्याचा उपचार चंद्रपूर येथे सुरू होता.अशातच काल दिनांक 16 मे 2025 रोज शुक्रवारला सकाळी 10 वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगुन तो घरून निघून गेला.
सायंकाळ झाली तरी तो घरी परत आला नाही.आणि रात्री उशीर व्हायला लागला तरी तो परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली.तो कुठेही दिसून न आल्याने शेवटी आज दिनांक 17 मे 2025 रोज शनिवारला सकाळी 7 वाजता गावातील एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उंबरीच्या झाडाला दीपक गळफास घेऊन लटकलेला अवस्थेत दिसला.
दीपकने गळफास घेतल्याची वार्ता गावात पसरताचं गावातील अनेक जणांनी शेताकडे धाव घेतली.वेगाव येथील पोलीस पाटलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला भ्रमणध्वनीवरून सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
व मृतदेहाचा घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.दीपकच्या पश्चात आई,वडील,एक विवाहित बहीण असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किसन शुंकूरवार करीत आहे.