राज्य महामार्गावरील गोविंदराजा कोटेक्स जवळील घटना
सुरेश पाच भाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील राज्य महामार्गावरी गोविंदराजा कोटेक्स जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 20 जून 2025 रोज शुक्रवारला 4 वाजताच्या सुमारास घडली.
An unknown vehicle hit a two-wheeler at high speed; the two-wheeler rider was seriously injured

अमित भास्कर दर्वे वय अंदाजे 24 वर्षे रा.महागाव( सिंधी) ता.मारेगाव असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहेत. अमित हा आज सकाळी महागाव येथून काही कामानिमित्त मारेगाव येथे आला होता.तेथील काम आटोपून तो दुपारी 4 वाजता सुमारास स्वगावी महागाव ( सिंधी) येथे जाण्याकरिता निघाला पण रस्त्यातच अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली यात तो गंभीर जखमी झाला झाला.

रस्त्याने ये – जा करणाऱ्या काही नागरिकांनी सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. व त्याला प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे दाखल करण्यात आले. पण तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.सदर अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.