संदीपभाऊ ढेंगळे यांची निवेदनाद्वारे मागणी
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी / वणी तालुक्यातील कायर – सिंधी वाढोना मार्गावरील वाहणाऱ्या विदर्भ नदी वरील असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने त्या पुलाला पावसामुळे पुर येत असतो. नुकताच झालेल्या पाऊसाने नद्या , नाले, भरून वाहू लागल्याने पुरामुळे कचरा हा पुलाजवळ जमा झाला आहेत.
Increase the height of the bridge over the Vidarbha River on the Kayar-Sindhi Vaddona route
त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक, पादचाऱ्यांना नाहक त्रास होत आहे.पाऊस पडल्यास या पुलावरून पाणी वाहू लागते. याच पुलावरून काही दिवसापूर्वी एक वाहन वाहून गेल्याने एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या आधी या पुलावरून वाहत जावून जीव गमवावा लागाला तरी ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन सदर कायर – सिंधी वाढोना रस्त्यावरील विदर्भ नदीवरील पुलाची उंची वाढवून नागरिकांना होणार त्रास दूर करावा करिता महाराष्ट्र प्रदेश युथ काँगेस आऊटरीच सेलचे तालुका अध्यक्ष संदीप ढेंगळे, विजय पारखी, प्रशांत जुमनाके ग्रा.पं.सदस्य पठारपुर (पि.वा) यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वणी याना निवेदन देण्यात आले.