धामणी येथील घटना
सततच्या आत्महत्येने समाजमन सुन्न
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या धामणी येथील एका 56 वर्षीय व्यक्तीने गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 21 जुन 2025 रोज शनिवारला सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
56-year-old man commits suicide by hanging
श्रीराम आत्माराम शिवरकर वय 56 वर्षे रा.धामणी ता.मारेगाव असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
श्रीराम हे रोज मजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होते. पण गेल्या अनेक दिवसापासून ते आजारी होते त्यांचे उपचार नागपूर तसेच सावंगी (मेघे)येथे सुरू होते. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे.
श्रीरामने आत्महत्या का केली हे अजूनही स्पष्ट नाही. त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. श्रीरामच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन विवाहित मुली नातवंड असा आप्त परिवार आहे.श्रीरामच्या आत्महत्येचा पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांचे मार्गदर्शनात शंकर बारेकर करीत आहे.