हवामान खात्याचा अंदाज फसला
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पहिली पेरणी केली होती पण ती जवळजवळ फसली आहे.पावसाला उशीर होत असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर ओढवले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे,परंतु पावसाअभावी पिके जळून जाण्याची भीती आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या वर्षी मान्सून लवकर येणार असून चांगली पर्जनवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने मे महिन्यातच वर्तविला होता.त्यानुसार कपाशी बियाण्यांची खरेदी करून शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणी केली.आज ना उद्या पाऊस येईल व आपली पेरणी साधली जाईल, या विश्वासावर शेतकरी होता.

मात्र जून महिन्याचे काहीचा दिवस बाकी राहिले आहेत पण अजूनपर्यंत तालुक्यात व जिल्ह्यात कुठेच अपेक्षित पहिला मुसळधार किंवा संततधार पाऊस अजूनही झाला नाही. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज पूर्णपणे फसला आहे.तालुक्यात मृग नक्षत्रातील पहिली पेरणी जवळजवळ फसली, शेवटच्या आशेवर शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा लागल्या असून निराशेचा सामना करावा लागत आहे.
पाऊला उशीर असल्याने अनेक शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी फसली असून शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला आहे. गेल्या त्या हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना खुल्या बाजारात हमीभावही मिळणे कठीण झाल्याने, शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही.
त्यानंतर अनेकांनी बँकांकडून घेतलेल्या बिन व्याजी कर्जाची परतफेड 2025 च्या मार्च महिन्यात करून नवीन कर्ज घेतले. ज्यांनी बँकांचे कर्ज भरले नाही, त्यांना नवीन कर्ज मिळाले नाही, तरीही पेरणी करावी लागतेच, म्हणून अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकरांकडून कर्ज घेऊन बियाणे खरेदी करून मृगनक्षत्रात पेरणी केली.
मात्र जुन महिना संपत आलाय महिन्याचे अवघे 7 दिवस शिल्लक आहे.तरी मान्सूनचा अपेक्षित पाऊस झाला नाही. किरकोळ स्वरूपामध्ये झालेल्या पावसामुळे व त्यानंतरच्या तिव्र उन्हाच्या तडाख्यामुळे उमलेले रोप नष्ट झाल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांच्या नजर आभाळाकडे लागल्या असून वातावरण ढगाळ दिसू लागल्याने आज ना उद्या पाऊस येईल, आणि आपले अंकुरलेले पिक वाचल्या जाईल, या आशेवर असून निघणार प्रत्येक दिवस शेतकऱ्यांची निराशा करीत आहे.


