ब्रेकिंग न्यूज
⚡ जलसंधारणातून फुलविली शाश्वत शेती; कैलास डोंगरकरांचा प्रयोग ठरतोय आदर्श! ✦ ⚡ तुळजापूरला ज्योत आणायला गेले अन् मृत्यूमुखी पडले, भरधाव कंटेनरने दुचाकीला 5 KM फरपटत नेलं, 3 उमद्या तरुणांच… ✦ ⚡ निसर्गाच्या कुशीत दडलेला पांडवदेवीचा आध्यात्मिक ठेवा! नवरात्रोत्सवासाठी तिवसाळा (जळका) येथील देवस्थान सज्ज ✦ ⚡ बी.फार्मसीचं शिक्षण घेतलं अन् दोन एकरात केला वेगळा प्रयोग, कष्टाला फळ आलं, पण सगळं ‘पाण्यात’ गेलं, Video ✦ ⚡ Abhijeet Dipke On Gyanesh Kumar | ‘ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच!’ | Delhi CJP Potest News ✦ ⚡ Suryakumar Yadav : गेम कोण फिरवणार तर गुड्डू! LIVE मॅच सुरू असताना सूर्याची भविष्यवाणी; पत्नीने थेट शेअर के… ✦ ⚡ Pune MPSC Protest News | MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा उद्रेक! नाशिकवरूनही विद्यार्थी पुण्यात दाखल ✦ ⚡ भारतातच नाही, पाकिस्तानातही नानांचे चाहते! अश्रू थांबत नाहीत म्हणत माजी क्रिकेटपटूनं शेअर केला VIDEO ✦ ⚡ ‘अमावस्ये’पर्यंत तक्रार मागे घे नाहीतर…, भोंदू बाबाच्या चेल्यांचं भयंकर कांड, फलटण प्रकरणात शॉकिंग अपडेट ✦ ⚡ Nana Patekar Death : तब्बल 45 मिनिटं सुरू होते नाना पाटेकरांना वाचवण्याचे प्रयत्न, पहाटे 5:20 ला काय घडलं? …
SP News Maregaon

दांडगाव येथील 45 वर्षीय शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

65 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू.

दांडगाव येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील दांडगाव येथील सुमारे 45 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोज रविवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की.
तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.

दांडगाव येथील तोताराम अंगत चिंचोलकर वय सुमारे 45 वर्ष रा.दांडगाव असे आत्महत्या केलेल्या विवाहीत शेतकऱ्याचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार तोताराम अंगत चिंचोलकर यांने दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोज रविवारला सकाळी 10 वाजताच्या सुमारास स्वतःच्या राहते घरी विषारी किटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारांसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र त्यांची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान 28 ऑगस्ट 2022 रोज रविवारच्या रात्री 12:30 वाजताच्या सुमारास चंद्रपूर येथील सरकारी दवाखान्यात त्यांचा मृत्यू झालाची माहिती प्राप्त झाली आहे. तोताराम व त्यांच्या वडिलांच्या नावाने दांडगाव येथे 23 एकर सामाईक शेती आल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे .

असून तोताराम यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी, दोन मुली असा आप्त परिवार आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण अजुन गुलदस्त आहे.पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार रजनीकांत पाटील, विनेश राठोड करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर