ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

35 वर्षीय युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

हिवरा (मजरा) येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासना कडून ठोस उपाय योजना केल्या जात नाही.तालुक्यात आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.हिवरा (मजरा) येथील एका 35 वर्षीय युवा शेतकऱ्यांने बोरीच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 14 जानेवारी 2025 रोज मंगळवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.

सविस्तर वृत्त असे की..
प्रवीण उर्फ गणपत सुदामजी ताजणे वय सुमारे 35 वर्ष रा.हिवरा (मजरा) ता.मारेगाव असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव असुन त्याच्या कडे 3 एकर शेती असल्याची माहिती आहे.तो शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा.बातमी लीहिपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

प्रवीण उर्फ गणपत हे काल नेहमीप्रमाणे शेतात जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जातो असे घरी सांगून ते शेतात गेले होते.शेतात गेल्यानंतर त्यांनी स्वतःचे शेतातील बोरीच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.

बराच वेळ होऊन सुद्धा मुलगा घरी परत न आल्यामुळे काही नातेवाईकानी शेतात जाऊन त्याचा शोधा-शोध केला असता ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती लगेच मारेगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पंचनामा करुन शव उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मृतक शेतकरी प्रवीण उर्फ गणपत यांचे पश्चात आई,वडील,पत्नी,एक मुलगी,एक विवाहित बहीण,असा आप्त परिवार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांचे मार्गर्शनाखाली जमदार भालचंद्र मांडवकर करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर