ब्रेकिंग न्यूज
Navi Mumbai Crime School | धक्कादायक! स्कूल बसमध्ये चिमुरडीसोबत गैरकृत्य | News18 Marathi Navi Mumbai: “ड्रायव्हर काकांनी त्रास दिला…” पोट दुखू लागल्यावर ३ वर्षाच्या चिमुकलीने आजीला काय सांगितलं,… तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी मारेगावात रणशिंग! Kolhapur: घरात कुणी नव्हतं, चुलत दिरानं एकटीला गाठलं अन्…, भयंकर कृत्यानं कोल्हापूर हादरलं! बांगलादेशच्या क्रिकेटरने इतिहास घडवला, ट्रिपल सेंच्युरी ठोकली… पण 400 रनचा चान्स स्वत:च सोडला! 2 लाख खर्च केला अन् पांढऱ्या सोन्याची झाली माती, बीडच्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी VIDEO पिंपरी-चिंचवडकर पाणी जपून वापरा, ऐन पावसाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? सविस्तर Pakistan Cricket : 24 तासात पाकिस्तान क्रिकेटमध्ये उलथापालथ! 7 खेळाडूंची हकालपट्टी केल्यानंतर सिलेक्टरचा रा… पावसाने वाढवली चिंता, फुलोऱ्यातच सोयाबीनची फुलगळ आणि पानगळ, शेतकऱ्याचा खर्चही निघणं अवघड पुजेला अजून सामान लागेल, नवऱ्याला घराबाहेर पाठवलं, भोंदूबाबाचा विवाहितेवर अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

पतीच्या निधनानंतर आधार दिला, पण नातेवाईकानंच घात केला, 26 वर्षीय महिलेसोबत…, छ. संभाजीनगरात भयंकर कांड

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर : पतीच्या निधनानंतर आधार देण्याच्या बहाण्याने 26 वर्षीय विधवा महिलेच्या जवळ आलेल्या 45 वर्षीय नातेवाईकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले. नंतर महिलेने त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाती उघडली. त्यावरून नातेवाइकांना संपर्काच्या विनंत्या पाठवून अन्य महिलेची अश्लील छायाचित्रे पीडितेची असल्याचे भासवून प्रसारित केली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे नोव्हेंबर 2025 मध्ये निधन झाले. त्यानंतर सासरच्या मंडळींसोबत मालमत्तेवरून वाद झाल्याने तिने हर्सल परिसरात भाड्याने घर घेतले. या काळात तिच्या दूरच्या नात्यातील 45 वर्षीय व्यक्तीने तिला आधार देण्यास सुरुवात केली. त्याने सहानुभूती दाखवत महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच आर्थिक मदत केली. त्यानंतर तिच्याशी जवळीक साधून शरीरसंबंध ठेवले.

दहावीची विद्यार्थिनी, आई म्हणाली अभ्यासाला बस, तिला राग आला, थेट साडी घेतली अन्… सोलापूर हादरलं!

जून 2026 मध्ये महिलेला नोकरी मिळाल्यानंतर आरोपी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तो तिला सतत शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 12 जूनच्या मध्यरात्री आरोपी महिलेच्या घरात घुसला आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध केला. त्यानंतर आरोपीने तिचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.

आरोपीच्या त्रासाला कंटाळून महिलेने आपले घर आणि मोबाईल नंबर बदलला. याचा राग आल्याने आरोपीने 25 ऑगस्ट रोजी इन्स्टाग्रामवर महिलेच्या नावाने दोन बनावट खाती उघडली. या खात्यांवरून त्याने पीडितेच्या नातेवाइकांना संपर्काच्या विनंत्या पाठवल्या. तसेच अन्य एका महिलेची अश्लील छायाचित्रे पीडित महिलेची असल्याचे भासवून समाजमाध्यमांवर प्रसारित केली.

दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे करत आहेत.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर