ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

चिंचमंडळ येथील शेतकऱ्याच्या मुलाने घेतली उंच भरारी

1.3k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खुशाल झोटिंग यांचा जीएसटी निरीक्षक झाल्याबद्दल खैरे कुणबी समाजाकडून गौरव

सुरेश पाचभाई मारेगाव

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांकडे एका वेगळ्या अँगलनं पाहिलं जातं. त्यांच्या अफाट क्षमतांवर संशय व्यक्त होतो. मात्र चिकाटी, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर यश कसं खेचून आणावं? हे झेडपी शाळेपासून शिक्षणाची सुरुवात करणाऱ्या आणि उत्तुंग यश मिळवणाऱ्या खुशालनं दाखवून दिलं.

खुशाल झोटिंग हा एम.पी.एस.सी. परीक्षेतून जीएसटी निरीक्षक म्हणून यशस्वी झाला. त्याबद्दल त्याचा खैरे कुणबी समाज संघटनेने विठ्ठलवाडी येथे  नारायण मांडवकर यांच्या घरी सत्कार केला.

मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ हे खुशालच गाव. त्यांचे वडील अनिल झोटिंग यांच्याकडे जेमतेम पाच एकर शेती.त्यात एक मोठा परिवार सांभाळणं म्हणजे कसरतच. मात्र एवढं असलं तरीही अनिल झोटिंग यांनी मुलांवर शिक्षण आणि संस्कार कमी पडू दिले नाहीत. त्यांच्या परिवारातील पाच सदस्य हे पदवीधर आहेत हे विशेष. अतिशय कठीण आणि विपरित परिस्थितीत खुशालने एमपीएससी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली.

अनेकदा अपयशांचा सामना केला. मात्र त्याचा संपूर्ण परिवार खंबीरपणे त्याच्या पाठीशी आजही उभा आहे. विशेषतः त्याचा भाऊ. खुशालने पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण चिंचमंडळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत घेतले. आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण मारेगाव आणि वणी येथे झाले. त्याने शिक्षणाचा ध्यास कायम ठेवला. पुढे यवतमाळ येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून त्याने बीएससी ऍग्री यशस्वीरित्या पूर्ण केलं.

यादरम्यान 2023 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सीची एमपीएससीची जाहिरात निघाली. रक्ताचं पाणी करून कित्येक तास तो अभ्यासाला लागला. अखेर त्याच्या परिश्रमाचा फळ मिळालं. खुशाल आता जीएसटी निरीक्षक म्हणून शासकीय सेवेत दाखल झाला.

त्याच्या या यशाबद्दल खैरे कुणबी समाज संघटनेनं नारायण मांडवकर यांच्या घरी विठ्ठलवाडीत खुशालचा सत्कार केला., यावेळी दिवाकर नरुले, गणेश लाकडे, रामदास भोयर, भास्कर सोमलकर, बाबाराव राऊत, नारायण मांडवकर, परशुराम पोटे आणि समाजातील माता भगिनी उपस्थित होत्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर