ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मारेगावात ओबीसी महिला समन्वय समितीचा जागतिक महिला दिन उत्साहात

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, विविध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : ओबीसी महिला समन्वय समिती, मारेगाव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून महिला सन्मानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मारेगावातील सर्व समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


या कार्यक्रमात नगरपंचायतीच्या सफाई कामगार सूरेखाताई यांचा साडी-चोळी देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच घरकाम करून कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या कष्टकरी महिलांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या नक्षत्र पाटणकर याचा विशेष गौरव करण्यात आला. त्याने CBSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरणताई देरकर होत्या, तर उद्घाटक म्हणून संध्याताई पोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ओबीसी महिला समन्वय समितीच्या अध्यक्षा इंदुताई किण्हेकार यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले.

प्रमुख अतिथी म्हणून अरुणाताई खंडाळकर, सुषमाताई काळे, कृषी अधिकारी दिपाली खवले, तलाठी रेणुका डाऊ तसेच सरकारी दवाखान्यात कार्यरत संगिता वानखेडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभा तातकोंडावार यांनी केले, तर आभारप्रदर्शन अर्चना दरनेश्वर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन शितल बदकी यांनी केले.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘मोबाईल’ या विषयावर वादविवाद स्पर्धा, कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा स्पर्धा, एकल नृत्य, जुमर नृत्य व समूह नृत्य अशा स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला.


स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे — वेशभूषा स्पर्धेत जीजाताई वरारकर प्रथम, वादविवाद स्पर्धेत विद्याताई मत्ते प्रथम, एकल नृत्यात जयश्री कल्लेवार प्रथम, तसेच जुमर नृत्यात लिना पोटे व वंदना बोंडे प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.

समूह नृत्यात रुपाली दूधकोहळे यांच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विभा पोटदुखे, डॉ. सपना केलोडे, सुवर्णा खामनकर, चित्रा डहाके, माधुरी ठमके, रोशनी गुंडावार, चेतना किण्हेकार, सोनाली ठेंगणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

महिलांच्या सन्मानासाठी आयोजित या कार्यक्रमामुळे मारेगाव परिसरात महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर