मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील मार्डी व कुंभा परिसरात बुधवारी झालेल्या वादळी पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे पोल उन्मळून पडले आहे.
चोपन येथील शेतकरी नितीन चिव्हाने यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झालेले आहे. मार्डी वडकी रोडवरील अनेक मोठी झाडे उन्मळून पडली. शेतातील उन्हाळी मांडव,जनावरांचा चारा, भाजीपाला पिकांचे या वादळी पावसात नुकसान झाले.

या परिसरात विजेचे पोल कोसळल्याने अनेक गावातील विज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरण कडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुर आहे.
महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरु केले असून नेमके किती नुकसान झाले याची अंतिम आकडेवाडी तयार व्हायची आहे.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.