मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की..
मारेगाव जवळ एका ॲटो चालकाचे नियंत्रण सुटून ॲटो पलटी झाल्याची घटना आज दिनांक 19 एप्रिल रोज मंगळवार रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली असून काही प्रवाशी जखमी झाले आहे .कुणाचीही जीवित हानी झाली नाही.
या वेळी जखमी मध्ये अनिता भुसरू आत्राम वय सुमारे 35 वर्षे रा. म्हेसदोड़का, मनोज सुभाष अंड्रसकर वय सुमारे 37 गोंड बुरांडा, नत्थु विठू कोवले वय सुमारे 55 वर्ष करणवाडी असे जखणीची नावे आहे.
या ऑटोतील 3 प्रवाशी एका गावातून मंगळवार बाजारासाठी मारेगाव येथे येत असताना मारेगांव येथे हा अपघात झाला.असून त्यांच्यावर मारेगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.