ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

‘भारत’ लिहिलेल्या 21 हजार तिळांद्वारे साकारला विठ्ठल:पंढरपुरात दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा शुभारंभ; सूक्ष्म कलाकृती व चित्रनिर्मितीने रसिक मंत्रमुग्ध

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सावळ्या विठुरायाच्या नगरीत आजपासून तीन दिवसीय दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात शुभारंभ झाला. राज्यभरातील अक्षरप्रेमी कलावंत, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीने श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संमेलन परिसर गजबजून गेला आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या अद्भुत आणि सूक्ष्म कलाकृतींचे प्रदर्शन रसिकांसाठी खुले करण्यात आले असून, पहिल्याच दिवशी याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या संमेलनाला पहिल्याच दिवशी पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांनी, तसेच लांबून आलेल्या विठ्ठल भक्तांनी व कलाप्रेमींनी मोठी गर्दी केली. विद्यार्थ्यांसह अक्षरप्रेमी नागरिक, महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पुढील दोन दिवस या संमेलनात विविध कलाविषयक आणि साहित्याच्या उपक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सुरेश मंदरे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन संमेलनामध्ये ‘युनिअमेझ आर्ट वर्क’ अंतर्गत ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये तीन वेळा नाव नोंदवणाऱ्या कराड येथील सुरेश जगन्नाथ मंदरे यांच्या सूक्ष्म कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तब्बल २१,००८ तिळांपासून साकारलेले ‘श्री विठ्ठला’ची कलाकृती या प्रदर्शनात सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहे. कलेचे हे दिव्य रूप पाहण्यासाठी रसिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. विशेष म्हणजे, या कलाकृतीतील प्रत्येक तिळावर सूक्ष्म अक्षरात ‘भारत’ असे लिहिले आहे. ‘लाइव्ह पेंटिंग’चा थरार! संमेलनादरम्यान कलाकारांनी थेट स्टेजवर भव्य कॅनव्हासवर चित्रकृती साकारल्या. एका कलाकाराने काळ्या रंगाच्या बॅकग्राउंडवर विठ्ठलाचे तेजस्वी रूप रंगांद्वारे काही क्षणांत जिवंत केले. तर दुसऱ्या सत्रात एका मान्यवरांचे हुबेहूब पोर्ट्रेट (चेहरेपट्टी) ‘लाईव्ह’ साकारून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. थक्क करणाऱ्या इतर सूक्ष्म कलाकृती या प्रदर्शनात सचिन मंदरे यांच्या इतरही अनेक थक्क करणाऱ्या कलाकृती पाहायला मिळत आहेत:
पानावर भगवद्गीता : एकाच पानावर संपूर्ण भगवद्गीता लिहिण्यात आली आहे.
माचिसच्या आकाराचे ग्रंथ: माचिसच्या (काडेपेटीच्या) आकारातील ‘गुरुचरित्र’ ग्रंथ आणि चक्क अंगठ्यावरील ‘ज्ञानेश्वरी’ पाहताना रसिक थक्क होत आहेत.
येशू ख्रिस्तांची प्रतिमा : अतिशय सूक्ष्म अक्षरात ‘जिझस’ हा शब्द ३,७५० वेळा लिहून येशू ख्रिस्तांच्या क्रूसचे विलोभनीय चित्र रेखाटले.
दिव्य मराठी विशेष
स्टेजवर विठुमाउलीचे चित्र साकारताना कलाकार.
२१ हजार तिळांतून साकारलेल्या विठ्ठलाच्या कलाकृतीसोबत कलाकार सुरेश मंदरे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर