ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

बारावीचा निकाल पुढील आठवड्यात:दहावीचा निकाल 15 मे पूर्वी लागण्याची शक्यता; 17 मे पासून 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढील आठवड्यात 5 किंवा 7 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे 15 मेपूर्वी दहावीचा निकालही घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा संपणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती. त्यात 37 हजार 338 विद्यार्थ्यांनी बारावीची, तर 32 हजार 433 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी व पालकांना निकालाची उत्सुकता लागली आहे. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला बारावीचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटची लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण मध्येच कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारल्याने हा निकाल आठवडाभर लांबण्याची शक्यता आहे. आता हा निकाल पुढील आठवड्यात 5 किंवा 7 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दहावीचा निकाल 15 मेपर्यंत लागण्याची शक्यता बारावीचा निकाल लागल्यानंतर 4-5 दिवसांनी दहावीचा निकाल घोषित होण्याची शक्यता आहे. राज्यात 17 मे पासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा निकाल तत्पूर्वी लागण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशाची लांबत जाणारी प्रक्रिया टाळण्यासाठी तसेच पुढील प्रवेशपूर्व परीक्षांमुळे दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्येच पूर्ण करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परीक्षाही पार पडली. परंतु आता संपामुळे निकालाची प्रक्रिया रखडली आहे. याचा परिणाम आतापुन्हा अकरावीच्या प्रवेशाला बसण्याची शक्यता आहे. का लांबला निकाल? गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत. 18 मार्चला परीक्षा संपल्यावर साधारणपणे 2 एप्रिलपर्यंत बारावी आणि 10 एप्रिलपर्यंत उत्तरपत्रिका तपासून जमा होणे अपेक्षित होते. परंतु उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर जी रिपोर्ट बनवून त्याची तपासणी करावी लागते. तेव्हढी प्रक्रिया बाकी आहे. दोन तीन दिवसा निकालाची तयारीही होती. परंतु आता कर्मचारी संपामुळे ती लांबली आहे, अशी माहिती विभागीय मंडळातील सहाय्यक सचिव दीपक कोकतरे यांनी नुकतीच दिव्य मराठीशी बोलताना दिली होती. हे ही वाचा… ऑटो-टॅक्सी चालकांसाठी नवा फॉर्म्युला समोर:मराठी सक्तीवर सरकारचा यू-टर्न की दिलासा? चालकांना 6 महिन्यांची मुदत
मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यात बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 1 मेपासून हा निर्णय लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या निर्णयावरून महायुती सरकारमध्येच मतभेद उघड झाले असून, काही नेत्यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सरकारकडून या निर्णयाचा फेरविचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर