ब्रेकिंग न्यूज
Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO Rohit Sharma : आयपीएल 2027 मध्ये KKR मध्ये जाणार? भर कार्यक्रमात अभिषेक नायरने आतली बातमी फोडली! हिटमॅनने ए… CRIME : लग्नाच्या शॉपिंगला निघालेल्या युवराजला संपवलं; Creta गाडीत तब्बल 7 तास मृतदेह, जुन्या ऑफिसच्या सहका… Monsoon Update: हवामान विभागाचा नवा अलर्ट अन् महाराष्ट्राची चिंता वाढली, परतीचा मान्सूननबाबत महत्त्वाचं अपड… द्राक्षबाग काढली अन् पैशाचं पीक लावलं, खर्च 10 हजार, कमाई अडीच लाख, सोलापूरच्या शेतकऱ्यानं काय केलं? Video Sangli: सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ, 10 लाखांच्या रोकडसह ‘ATM’ मशीनच पळवलं, मध्यरात्रीच थरार
SP News Maregaon

रोहिणी नक्षत्राचा शुभसंकेत!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची लगबग वाढली; खरीप हंगामाच्या तयारीला वेग

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यात रोहिणी नक्षत्र लागताच शेतकऱ्यांच्या कामांना चांगलाच वेग आला असून संपूर्ण शिवारात खरीप हंगामाच्या तयारीची धामधूम पाहायला मिळत आहे. मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वीच शेतकरी नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती आणि शेती मशागतीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत.

पहाटेपासून रात्रीपर्यंत शिवारात ट्रॅक्टरचा आवाज घुमत असून शेतकरी नव्या आशा आणि उमेदीने कामाला लागले आहेत.गेल्या काही वर्षांतील अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि नापिकीच्या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला यंदाच्या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. “रोहिणीचे वातावरण समाधानकारक असून निसर्गराजा यंदा साथ देईल,” असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर, भात आदी पिकांसाठी जमीन तयार करण्याची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. कृषी केंद्रांवर बी-बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत असून शेती अवजारांच्या दुरुस्तीच्या कामांनाही वेग आला आहे.दरम्यान, पावसाचे अनुकूल संकेत मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि नव्या हंगामाची उत्सुकता दिसून येत आहे.

“यंदा निसर्गाने साथ दिली तर बळीराजाचे संकट दूर होईल,” अशी भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे. मारेगाव तालुक्यात सध्या खरीप हंगामाची चाहूल आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीची धडाकेबाज सुरुवात पाहायला मिळत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर