ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पिंपरी-चिंचवड हादरले!:आरपीआय कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल मोरेंची निर्घृण हत्या, पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात बुधवारी (13 मे) रात्री एका भीषण हत्याकांडाने राजकीय वर्तुळ हादरले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. मोशी येथील ‘युवराज रेस्टॉरंट अँड बार’मध्ये रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोरे हे मोशीतील युवराज रेस्टॉरंटमध्ये असताना रात्री साडे नऊच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला. हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मोरे यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या त्यांचा मृतदेह पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, त्याद्वारे मारेकऱ्यांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून, संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. रुग्णालय परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी अनिल मोरे यांच्या हत्येची बातमी पसरताच पिंपरीतील वायसीएम रुग्णालय परिसरात आरपीआय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा काही कार्यकर्त्यांनी घेतला आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ही हत्या जुन्या वाद किंवा पूर्ववैमनस्यातून झाली असावी असा संशय आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण तपासाअंतीच स्पष्ट होईल. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर