ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

काँग्रेसचा महापौर पदासाठी भिवंडीत मोठा गेम:भिवंडी सेक्युलर फ्रंटची केली घोषणा; आघाडीत सप, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


काँग्रेसने भिवंडी – निजामपूर महापालिकेचे महापौरपद मिळवण्यासाठी भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. या आघाडीत काँग्रेससह समाजवादी पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा समावेश आहे. यामुळे भिवंडीत काँग्रेसचा महापौर बसेल हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिकांची नुकतीच निवडणूक झाली. त्यानंतर आता या ठिकाणी महापौर पदाच्या निवडीसंदर्भात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी युत्या व आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भिवंडी महापालिकेच्या महापौरपदासाठी सप – काँग्रेस – राष्ट्रवादी (शरद पवार) या 3 पक्षांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटची घोषणा केली आहे. भिवंडी पूर्वचे सप आमदार रईस शेख हे या फ्रंटचे संयोजक आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार रशीद मोमीन हे अध्यक्ष, तर शरद पवार गटाचे सोहेल गुड्डू हे सहसंजोयक आहेत. सेक्युलर फ्रंटकडे स्पष्ट बहुमत 90 सदस्यीय भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी 46 हा जादुई आकडा आहे. त्यामुळे सेक्युलर फ्रंटकडे सध्या काँग्रेसचे 30, शरद पवार गटाचे 12 व सपचे 6 असे एकूण 48 नगरसेवक आहेत. त्यामुळे याच आघाडीचा महापौर होईल हे स्पष्ट आहे. या आघाडीची माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, भिवंडीच्या जनतेने धर्मनिरपेक्ष पक्षांना कौल दिला आहे. त्याचा आदर करत आम्ही भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली आहे. एकता, बंधूभाव व विकास हा आमच्या फ्रंटचा मुलाधार असले. भिवंडीत आता एकही नगरसेवक विकला जाणार नाही याची खात्री आम्ही देऊ. भिवंडी सेक्युलर फ्रंटला सपचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व शरद पवार गटाचे स्थानिक खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांचा पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे समाजवादी पार्टीने स्थानिक पातळीवर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार रईस शेख यांना दिले आहेत. तसे पत्र अबू आझमी यांनी प्रसिद्ध केले आहे. सेक्युलर फ्रंटचाच महापौर होईल – आमदार रईस शेख भिवंडी – निजामपूर महापालिकेत धर्मनिरपेक्ष आघाडीचा महापौर बसवणे हे आमच्या भिवंडी सेक्युलर फ्रंटचे उद्दीष्ट आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वसमावेशक विकास यासाठी आमची आघाडी कटिबद्ध आहे. भिवंडीकरांनी आम्हाला ऐतिहासिक कल दिला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आमचा फ्रंट कायम प्रयत्नशील असेल, असेही रईस शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर