ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

घराणेशाहीला जनतेने नाकारले:अशोक चव्हाणांच्या नांदेडमध्ये भाजपच्या एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांचा केविलवाणा पराभव, शरद पवार गटाची सरशी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषद निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल सहा जणांना उतरवणाऱ्या भाजपला मतदारांनी चोख प्रत्युत्तर दिले असून, या सहाही उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. घराणेशाहीला थारा न देता मतदारांनी लोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करत भाजपला मोठा धक्का दिला आहे. लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. मात्र, केवळ नगराध्यक्षपदच नव्हे तर नगरसेवक पदाच्या इतर पाच जागांवरही त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली होती. सातत्याने घराणेशाहीवरून काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या भाजपची ही कृती म्हणजे घराणेशाहीचा कळस असल्याची टीका विरोधकांकडून होत होती. भाजपच्या या ‘कौटुंबिक’ उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यात खालील सदस्यांचा समावेश होता: अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाला धक्का माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होती. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात असताना, एकाच कुटुंबाला 6 जागा देण्याच्या निर्णयामुळे चव्हाणांवर नामुष्की ओढवली आहे. इच्छुकांची संख्या मोठी असतानाही केवळ एकाच घराण्याला प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी मतपेटीतून बाहेर आल्याचे दिसत आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर पक्षाची ताकद वाढेल अशी अपेक्षा होती, मात्र लोहा येथील निकालाने त्यांच्या जिल्ह्यावरील पकडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शरद पवार गटाची बाजी, चिखलीकरांनाही झटका लोहा हा भाग राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी यांच्यातील तिरंगी चुरशीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदावर विजय मिळवून बाजी मारली आहे. चिखलीकरांच्या बालेकिल्ल्यात आणि अशोक चव्हाणांच्या जिल्ह्यात पवारांच्या राष्ट्रवादीने मिळवलेला हा विजय आगामी विधानसभेसाठी महत्त्वाचे संकेत देणारा ठरला आहे. हे ही वाचा… परळीत भाजप-राष्ट्रवादी युतीचा विजय:आजचा निकाल परळीला बदनाम करणाऱ्यांच्या तोंडात लगावलेली चपराक – धनंजय मुंडे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात महायुतीने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. परळीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि रिपाइंच्या महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, अंबाजोगाई आणि गेवराईतही भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. या विजयानंतर बोलताना आमदार धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी जनतेचे आभार मानत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर