मार्डी येथील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगांव :- तालुक्यातील मार्डी येथील वडीलांच्या घरी राहत असलेल्या रोशनी आशिष झाडे वय सुमारे 24 वर्षे असे वडिलांच्या घरी आत्महत्या केलेल्या विधवा महिलेचे नाव असुन मार्डी येथील जीवन नारायण वैद्य यांच्या मुलीचे लग्न 2 वर्षांपूर्वी वर्धा जिल्यातील हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर गावांतील आशिष झाडे यांच्याशी विवाह झाला होता.
त्यांना एक मुलगी सुद्धा आहे. यांचा सुखाने संसार सुरु असतांना मागील दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुलीच्या संगोपणाची जबाबदारी रोशनीवर आली पतीच्या निधनानंतर रोशनी ही सतत मानसिक तणावात असायची. आता आपण मुलीचा सांभाळ कसा करायचा अश्या विवंचनेत होती.
दिनांक 7 जुन रोज मंगळवारला सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास मार्डी येथील वडिलांच्या घरी कोणीही नसताना घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने चिमुकलीसह गळफास घेतला छोट्या मुलींचे नशीब चांगले म्हणून चिमुकलीचे प्राण वाचले पण आईला जीव गमवावा लागला. सुमारे 9 महिन्याच्या चिमुकलीचे वणी येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
वडिला नंतर काही महिन्यात आईचाही मृत्यू झाल्याने 9 महिन्याची चिमुकली आता पोरकी झाली आहे.या घटनेने मार्डी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मारेगांव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होवून घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.व या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहे.