तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी :- मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी गावातील निराधार लोकांना कागदोपत्री साठी मार्गदर्शन केले व तालुक्याच्या ठिकाणी नेऊन स्व खर्चाने स्व पुढाकाराने निराधार लोकांना कागदोपत्री मदत केली.असल्याचे पहायला मिळाले. अनेकांचा जाण्यायेण्याचा खर्च स्वतः गाडी करून तहसील ठिकाणी नेले.
मीना जगदीश आरमुरवार यांच्या लक्षात आले होते की आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत गावात बरेच असे आधार नसलेली लोकांची संख्या आहे. त्या लोकांना दैनंदिन जीवन जगण्यासाठी आर्थिक त्रास होत आहे. अनेक जन संजय गांधी निराधार, श्रावण बाळ निराधार योजने पासून वंचित आहेत. या सर्वांना शासकीय योजनेचा लाभ मिळायला हवा. अनेक वयोवृद्ध व अपंग, विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ निराधार योजने अंतर्गत दर महिना एक हजार ते बाराशे रुपय मिळतात.
महागाईच्या काळात ही आर्थिक मदत पुरेशी नसली तरी वयोवृद्ध, अपंग, विधवा महिलांना हा मोठा आधार आहे. परंतु अनेक जाचक अटींमुळे लाभार्थी या योजनांपासून वंचित आहेत. ते वंचित राहू नये म्हणून मुकूटबन ग्रामपंचायत सरपंच मीना जगदीश आरमुरवार यांनी गावातील निराधार लोकांना स्व खर्चाने स्व पुढाकाराने तालुक्याच्या ठिकाणी नेऊन सहकार्य केले. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सूद्धा परीश्रम घेतले असल्याचे पहायला मिळाले.