२०५ रुग्णावर होणार मोफत शत्रक्रिया.
मंगेश पाचभाई व मेघे रुग्णालय यांच्या सहकार्याने घेतला अनेकांनी लाभ.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी रविवार दिनांक ७ आगष्ट २०२२रोज दत्ता मेघे रुग्णालय व मंगेश पाचभाई मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पुनकाबाई आश्रम शाळा मुकुटबन येथील घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात १२३५ लोकांनी आपली तपासणी करून त्यातील २०५ लोकांना शत्रक्रिये साठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले.या महाआरोग्य शिबीरात कान,नाक,घसा,डोळे,स्त्री रोग,मेडिसीन,अस्तितरोग,बाल रोग अश्या प्रकारे सर्व रोगनिदान शिबिरात अनेकाने तपासण्या करून घेतल्या.

या कार्यक्रमाल अध्यक्ष म्हणून किरण ताई देरकर,प्रमुख पाहुणे मुकुटबन चे पोलीस निरीक्षक अजित जाधव.डॉ.परशिवें, सरपंच सीमा लालसरे,संतोष बरडे,आयोजक जनसेवक ,राहुल ठाकूर,गणेश पेटकर संजय आत्राम,संतोष पारखी, दिगांबर पाचभाई,गोलू बुच्छे,प्रनल गोंडे राजू चौधरी,दत्त लालसरे,निलेश डाहुले,दिनेश जीवतोडे आदी सहकार्याने या भव्य शिबीराचे अयोजन केले होते परिसरतील अनेक जनतेने या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.


