ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

उभ्या असलेल्या कारची एअरबॅग अचानक उघडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं:मुंबईत 25 वर्षीय कार विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. सेकंड-हँड कारचा व्यवसाय करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा कारची तपासणी करत असताना स्टिअरिंगमधील एअरबॅग अचानक उघडल्याने मृत्यू झाला. एअरबॅग उघडताना तिच्या प्लास्टिक कव्हरचा जबरदस्त फटका मानेवर बसल्याने गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. या विचित्र अपघातामुळे वाहनांच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि एअरबॅगच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मृत तरुणाची ओळख मोहित सुरेश सोनी (वय 25) अशी असून तो मीरा रोडमधील काशीमिरा परिसरातील टियारा हिल्स सोसायटीचा रहिवासी होता. कारची तपासणी करत असतानाच घडला दुर्दैवी प्रकार मोहित सोनी हे सेकंड-हँड कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होते. विक्रीसाठी आलेल्या वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करूनच ते व्यवहार पूर्ण करत असत. बुधवारी दुपारी ते MH-01-AL-6301 क्रमांकाच्या सुमारे 15 वर्षे जुन्या होंडा कारची तपासणी करण्यासाठी काशीमिरा येथील प्लेझंट पार्क सोसायटीजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनात बसले होते. याचवेळी कोणताही अपघात किंवा धक्का न लागता स्टिअरिंगमधील एअरबॅग अचानक सक्रिय झाली. एअरबॅग उघडताच तिचे प्लास्टिक कव्हर प्रचंड वेगाने उडाले आणि मोहित यांच्या मानेच्या उजव्या बाजूला जोरात आदळले. या जबर धडकेमुळे त्यांच्या मानेला खोल जखम झाली आणि काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. मदत मिळण्यास उशीर; कारमध्येच रक्तस्राव पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, कार रस्त्याच्या कडेला उभी असल्याने सुरुवातीला ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. वाहन उभे असल्यामुळे नागरिकांना काहीतरी अनर्थ घडल्याचा संशयही आला नाही. या विलंबामुळे मोहित यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. ते कारच्या आतच गंभीर जखमी अवस्थेत पडून राहिले आणि अतिरक्तस्रावामुळे त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली. स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मोहित यांना भायंदर येथील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. बाह्य अपघाताचा कोणताही पुरावा नाही घटनेनंतर काशीमिरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहनाची प्राथमिक तपासणी केली. वाहनाच्या चारही बाजू तपासल्यानंतर कोणताही बाह्य अपघात, धडक किंवा नुकसान झाल्याचे आढळले नाही. त्यामुळे कोणताही धक्का न बसता एअरबॅग अचानक कशी सक्रिय झाली, हा तपासाचा मुख्य मुद्दा बनला आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित कार 15 वर्षे जुनी असली तरी तिचे वैध फिटनेस प्रमाणपत्र असल्याचेही समोर आले आहे. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी या घटनेनंतर फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. कारच्या आतील भागातील रक्ताचे नमुने आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले असून त्याच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे. आरटीओ आणि वाहनतज्ज्ञांकडून तांत्रिक तपासणी या प्रकरणी काशीमिरा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून वाहनाची सखोल तांत्रिक तपासणी करण्यासाठी वाहनतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अधिकाऱ्यांनाही वाहनाच्या यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल प्रणालीची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. एअरबॅग प्रणालीमध्ये बिघाड झाला होता का, सेन्सरमध्ये दोष होता का किंवा इतर कोणत्या तांत्रिक कारणामुळे एअरबॅग सक्रिय झाली, याचा अहवाल तयार केला जाणार आहे. वाहनाचा इतिहासही तपासणार तपास यंत्रणा आता संबंधित वाहनाचा संपूर्ण इतिहास तपासत आहे. या कारचा पूर्वी अपघात झाला होता का, एअरबॅग प्रणालीची दुरुस्ती किंवा बदल करण्यात आला होता का, वाहनाच्या सर्व्हिसिंगमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या का, तसेच मूळ मालकाकडे वाहन असताना कोणते बदल करण्यात आले होते, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, मृत मोहित सोनी यांचे भाऊ कुलदीप सोनी यांनी या घटनेची सखोल चौकशी करून नेमके कोणत्या कारणामुळे एअरबॅग अचानक उघडली आणि त्यांच्या भावाचा मृत्यू झाला, याचा संपूर्ण खुलासा करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. या तपासाच्या अहवालाकडे आता वाहन उद्योगासह सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर