ब्रेकिंग न्यूज
⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शाळा सुटल्यावर चौथीच्या मुलींना थांबवायचा, कपडे काढून डान्स करायचा अन्…, बीडमध्ये शिक्षकाचं भयंकर कृत्य, … ✦ ⚡ शिवाजी पार्कची दोस्ती, ‘नटसम्राट’ पाहून ढसाढसा रडला होता 1983 च्या वर्ल्ड कपचा हिरो! नाना पाटेकरांच्या क्रि… ✦ ⚡ शेताच्या बांधावरून थेट रुपेरी पडद्यावर! वेगावच्या अजय बदकी यांची ‘हुंकार’मधून दमदार एन्ट्री! ✦ ⚡ शेतकरी ते यशस्वी उद्योजक, नाशवंत भाजीपाल्याने पालटलं नशीब, आता महिन्याला 2 लाखांची कमाई ✦ ⚡ दुष्काळात बीडच्या शेतकऱ्यानं करून दाखवलं, 500 रुपयांच्या खर्चात मिळवलं तब्बल 32 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन, … ✦ ⚡ लेकीच्या सुखासाठी कर्ज काढलं, पण जावई निघाला…, लग्नानंतर 4 महिन्यांत सगळं संपलं, संजनाचा आईला शेवटचा फोन … ✦ ⚡ Pawanraje Nimbalkar Murder Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाला नवं वळण! पद्मसिंह पाटलांचा पाय खोलात? CB… ✦ ⚡ CRIME : फेसबूक LIVE सुरू असताना थरारक हत्याकांड! मेडिकल स्टोअरबाहेर पेटला वाद अन् ‘स्टिंग ऑपरेशन’ करताना झा… ✦ ⚡ Success Story : शेती करावी तर अशी, तीन पिकातून बीडच्या शेतकऱ्याचं पालटलं नशीब, वर्षाला 8 लाख कमाई, Video
SP News Maregaon

रोहित पवार, पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार:’ऑपरेशन तुतारी’ आधीच झाले होते, शरद पवार-अजितदादांच्या ‘त्या’ भेटीवरून शिरसाटांचा मोठा दावा

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आम्हाला उद्धव ठाकरे यांचा स्वभाव माहिती आहे, मी त्यांच्यासोबत काम केले आहे, ते कधी तोंड फिरवतील याचा काही नेम नाही. रोहित पवारांनी आपला पक्ष वाचवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. कधी हे ऑपरेशन तुमच्याकडे येईल हे सांगता येत नाही, आता काही जरी बोलत असलात तरीसुद्धा पुढे तुम्ही आमचेच झेंडे घेऊन फिरणार आहात, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, ऑपरेशन तुतारी पहिलेच झाले असते. अजित पवार असतानाच हे झाले होते. शरद पवार आणि अजित पवार यांची दिल्लीत झालेली भेटीत भाजपसोबत जायचे ठरले होते हे काय रोहित पवारांना माहिती नाही का? हे सर्वांना माहिती आहे असा दावा शिरसाट यांनी केला आहे. ऑपरेशन टायगर 3 निश्चित होणार संजय शिरसाट म्हणाले की, ऑपरेशन टायगर 3 हे निश्चित होणार आहे. पण त्यासाठी कोणावर जबाबदारी देण्यात येणार नाही. ते गुप्तपणे होईल आणि झाल्यावर त्यांची घोषणा एकनाथ शिंदे करतील. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणाले असतील की उद्धव ठाकरेजी तुम्ही ऐकले नाही ते ऐकले असते तर माझे मातोश्रीवर येणं बंद झाले नसते, अशी चर्चा दोघांमध्ये झाली असेल. त्या प्रवासाकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. केवळ नावापुरता दौरा संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा आज यवतमाळ-वाशिम-हिंगोली दौरा करणार आहेत. त्यांचा हा धावता दौरा आहे, यामध्ये ते किती लोकांना भेटणार आहेत, काय बोलणार? हा दौरा केवळ 6 खासदार सोडून गेल्यावर मी त्यांच्या मतदारसंघात जाऊन आलो हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे. फडणवीस-ठाकरेंमध्ये संवाद झाला वाटत नाही संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल एकाच विमानाने प्रवास केला. पंतप्रधान मोदी यांनी इंधन वाचवा असे जे सांगितले म्हणून उद्धव ठाकरे काल पहिल्यांदा इंडिगोच्या विमानाने गेले खरी बातमी ही आहे. त्या विमानात ते फडणवीस यांच्याशी काय बोलले माहिती नाही. पण मला वाटत नाही त्यांच्यात काही संवाद झाला असेल. पण संवाद झाला पाहिजे, आपण हितसंबंध जपले पाहिजे. उबाठामधील काही नेत्यांसोबत माझे आजही जवळचे संबंध आहेत. त्यांची फडणवीस यांच्याशी काही बोलणी झाली असेल मला वाटत नाही. उद्धव ठाकरेंचा कल कुठे ही बातमी संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जे व्हिजन आहे त्यांला मान्यता दिल्याने त्यांनी चार्टर्ड विमान न वापरता इंडिगोच्या विमानाने प्रवास केला आहे. नसता 35 मिनिटाच्या प्रवासासाठी ते चार्टर्ड विमान वापरत होते. यामुळे त्यांचा कल कुठे झुकलेला आहे ही खरी बातमी आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास करणे यात काहीही योगायोग नाही. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला आमच्या शुभेच्छा आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर