बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Latur Crime News (शशिकांत पाटील, प्रतिनिधी) : लातूर शहरातील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयाचे 65 वर्षीय संस्थाचालक संजय चंद्रभानू सोनवणे यांनी राहत्या घरी परवानाधारक पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना 14 ते 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. आत्महत्या केली त्यावेळी सोनवणे हे घरी एकटेच होते. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या बहिणीला मुंबईहून लातूरला बोलावून घेतलं होतं. मात्र, बहीण लातूरला घरी पोहोचण्यापूर्वीच सोनवणे यांनी टोकाचे पाऊल उचललं. सोनवणे यांनी मृत्यूपूर्वी बहिणीला काय सांगितलं होतं? याची माहिती समोर आली आहे.
बहिणीला फोन करून काय म्हणाले?
संजीव सोनवणे यांच्या पत्नी मोठ्या मुलीच्या डिलिव्हरीसाठी अमेरिकेत गेल्या होत्या. त्यामुळे संजीव सोनवणे घरात एकटेच होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या डोक्याला टाके पडले होते. हेच टाके काढण्यासाठी संजीव सोनवणे पुण्याला जाणार होते. त्याआधी त्यांनी बहिणीला फोन करून बोलवून घेतलं. डोक्याचे टाके काढायला आहेत, असं म्हणत बहिणीला सोनवणे यांनी फोन केला होता. मंगळवारी सकाळी बहीण घरी आली तेव्हा हा सर्व प्रकार समोर आला.
Latur Crime : लातूरचे संस्थाचालक संजीव सोनवणे मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! चिठ्ठीतील ‘स्विट फूल’ शब्दाने मृत्यूचं गुढ वाढलं! पोलीसही चक्रावले
चिठ्ठीत ‘स्विट फूल’ या शब्दाचा प्रयोग
मंगळवारी सकाळी बहीण घरी पोहोचल्यानंतर सोनवणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. तसेच त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला चिठ्ठी सापडली, जी इंग्रजी भाषेत लिहिली होती. अखेरच्या चिठ्ठीत त्यांनी असा काही शब्द वापरला की, सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. अखेरच्या चिठ्ठीत त्यांनी ‘स्विट फूल’ हा शब्दाचा प्रयोग केलाय. याचा अर्थ गोडपणे मूर्ख बनवणे असा होतो.
आत्महत्या का केली?
दरम्यान, सोनवणे यांनी नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली? त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक, आरोग्याशी संबंधित किंवा अन्य काही कारण होते का? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र संपूर्ण लातूरमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.