ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विजय वडेट्टीवारांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव:कंबोडिया किडनी प्रकरणावरून भाजप आमदार योगेश सागर आक्रमक, सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने कर्ज फेडण्यासाठी कंबोडियात जाऊन किडनी विकल्याच्या घटनेने राज्य हादरले असतानाच, आता या प्रकरणावरून विधानसभेत राजकीय रणकंदन माजले आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात चुकीची आकडेवारी देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत, भाजप आमदार योगेश सागर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याला खाजगी सावकाराने कर्जाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याला कंबोडियाला नेऊन त्याची किडनी विकायला लावल्याचा धक्कादायक प्रकार दोन महिन्यांपूर्वी समोर आला होता. यासंदर्भात आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेदरम्यान विजय वडेट्टीवार यांनी दावा केला की, तब्बल 19 शेतकऱ्यांनी अशा प्रकारे आपल्या किडन्या विकल्या आहेत. ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न- योगेश सागर भाजप आमदार योगेश सागर यांनी वडेट्टीवारांच्या या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सागर म्हणाले की, मंत्री महोदयांनी सभागृहात दोनवेळा स्पष्ट केले होते की हा 19 शेतकऱ्यांचा आकडा चुकीचा आहे. कंबोडिया प्रकरणात महाराष्ट्रातील केवळ दोन व्यक्ती होत्या, त्यापैकी दुर्दैवाने एक जण शेतकरी आहे. तरीही वडेट्टीवारांनी वारंवार 19 हा आकडा सांगून एक खोटा ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न केला. पद्मश्री पुरस्काराचा अपमान योगेश सागर यांनी वडेट्टीवारांच्या दुसऱ्या एका विधानावरही बोट ठेवले. वडेट्टीवार म्हणाले होते की, ज्या डॉक्टरांनी हे ऑपरेशन केले ते ‘पद्मश्री’ विजेते आहेत. यावर उत्तर देताना सागर म्हणाले, संबधित डॉक्टर पद्मश्री नाहीत. अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवणे हा खऱ्या पद्मश्री विजेत्यांचा आणि या सर्वोच्च नागरी सन्मानाचा अपमान आहे. मंत्र्यांनी वारंवार दुरुस्ती करूनही वडेट्टीवारांनी खोटा आकडा रेटून धरला, ही सभागृहाची दिशाभूल आहे. महाराष्ट्राचा शेतकरी गरीब असेल, संकटात असेल, पण तो ‘किडनी विकणारा’ नाही. अशा विधानांमुळे शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली आहे. विजय वडेट्टीवार यांनी वारंवार सांगूनही आपल्या वक्तव्यात सुधारणा केली नाही, त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी योगेश सागर यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे आता आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर