ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शहरात दुपारी मान्सूनपूर्व‎वादळी पावसाची हजेरी‎:मान्सूनचे आगमन 22 जून नंतर होण्याची शक्यता‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरात मंगळवार १६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास मान्सुनपूर्व वादळी पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला वादळाचा जोर असला तरी नंतर मात्र तो ओसरला. सुमारे ३० मिनिटे तुरळक हलका ते मध्यम पाऊस झाला. शहरात आजवर सायंकाळी वादळी पाऊस हजेरी लावत होता. परंतु, आज प्रथमच दुपारी पाऊस आल्याने कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. काहींनी ऐनवेळी त्यांच्याकडे असलेल्या छत्र्या उघडून पावसापासून बचाव केला तर काहींनी रेनकोट घातले. गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस हजेरी लावत असल्याने शहराच्या तापमानात दिलासादायक घट झाली असून कमाल तापमान २४ तासांत २.२ अंशाने कमी होऊन ३७.४ अंश सेल्सियसपर्यंत तर किमान तापमान १८.८ अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. सध्या जिल्ह्यातत तुरळक ते विखुरलेल्या उर्वरित. पान ४ ^मान्सूनचा पाऊस सध्या फार संथगतीने प्रवास करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची उत्तर सीमा सिंधुदुर्ग (सरनई), सोलापूर, हैदराबाद अशी आहे. सध्या मान्सूनच्या पुढील प्रगती करीता परिस्थिती फारशी चांगली नाही. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे किंवा कमी दाबाचे क्षेत्र अशी कोणतीही परिस्थिती नाही. त्यामुळे मान्सून वेगाने पुढे सरकत नाही. तरीही पुढील २-३ दिवसात तो महाराष्ट्राच्या आणखी काही भागात तो पोहोचण्याची शक्यता आहे. – प्रा अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर