ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

सारसबाग बंद निर्णयावरून काँग्रेसचा महापौरांवर हल्लाबोल:’भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न’ म्हणत प्रश्नचिन्ह

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे शहरातील सारसबाग दोन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णयावरून काँग्रेसने पुणे महानगरपालिका प्रशासन आणि महापौर मंजूषा नागपुरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुरक्षेच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते चंदूशेठ कदम यांनी केला. ऐतिहासिक सारसबाग २८ आणि २९ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) आणि महापालिका आयुक्तांचा असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रशासनाकडून अधिकृत प्रसिद्धिपत्रक येण्यापूर्वीच महापौरांनी आपल्या वैयक्तिक सोशल मीडिया खात्यावरून याची घोषणा का केली, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. चंदूशेठ कदम यांनी महापौरांवर निशाणा साधत म्हटले की, मंजूषा नागपुरे या भाजपच्या महापौर आहेत की संपूर्ण पुणे शहराच्या? घटनात्मक पदावरील व्यक्तीने प्रशासकीय निर्णयांचे श्रेय घेण्यासाठी किंवा राजकारणासाठी अशी घाई करणे अयोग्य आहे. सुरुवातीला बाग बंद ठेवण्यामागे दुरुस्तीचे कारण देण्यात आले होते, परंतु सोशल मीडियावर टीका झाल्यानंतर सुरक्षेचे कारण पुढे करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे निर्णयामागील हेतूबाबत संशय निर्माण होत असल्याचे कदम म्हणाले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण पुढे करून सारसबाग बंद ठेवणे म्हणजे एका विशिष्ट समाजाला किंवा सणाला लक्ष्य करण्यासारखे असल्याची टीका कदम यांनी केली. सोशल मीडियावरील काही भ्रामक व्हिडिओंचा आधार घेत शहरातील वातावरण बिघडल्याचा आभास निर्माण करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सारसबाग हे केवळ पर्यटनस्थळ नसून पुणेकरांच्या विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी पोलिसांनी आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवून बाग खुली ठेवायला हवी होती, असेही चंदूशेठ कदम यांनी स्पष्ट केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर