बोटोणी येथे 28 वर्षीय युवकाची गळफास घेवुन आत्महत्या.

0
128

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात आत्महत्येची सत्र सूरूच असताना काही काळाच्या विश्रांती नंतर आज दिनांक 22ऑक्टोबर 2022 रोज शनिवार ला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास बोटोणी येथे घडली.सुशांत दिलीप वासेकर वय सुमारे 28 वर्ष रा.बोटोणी असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असुन त्याने स्वतःच्या घरातील फाट्याला ओडणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.आज सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास उघडकिस आली.

तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही.शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. अशीच मन हेलावून टाकणारी घटना आज दिनांक 22ऑक्टोंबर 2022 रोज शनिवारला ला बोटोणी येथे ह्रदयद्रावक घटना घडली. वेगवेगळ्या करणांनी मोठ्यांनी आत्महत्या केलेल्या बघितल्या. आता हा मोर्चा युवकांकडे वळल्याचे दिसत आहे.

आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी ही घटना नक्कीच मनाला चटका लावून जाणारी आहे. आहे.सुशांत यांच्या पश्चात आई,एक बहिण असा आप्त परिवार आहे.या घटनेची मारेगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व त्या नंतर त्याला उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कडू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश पूरी यांचा मार्गर्शनाखाली मारेगाव पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here