बाल लैंगिक अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील एका 23 वर्षीय युवकाचे तालुक्यांतील एका गावातील अल्पवयीन मुलीसोबत मागील 2 वर्षापासुन प्रेम संबंध होते.
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील श्रीरामपुर येथील राजकुमार रामभाऊ मेश्राम वय सुमारे 23 वर्ष ह्या युवकाचे तालुक्यांतील एका गावातील अल्पवयीन मुली सोबत प्रेम संबंध होते. राजकुमार हा त्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून व अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गावाशेजारी असलेल्या त्याच्या आजीच्या शेतात नेवुन त्या मुलीसोबत जबरदस्तीने अत्याचार करत होता.
वारंवार अत्याचार केल्याने अल्पवयीन 16 वर्षीय मुलगी ही 4 महिन्यांची गर्भवती झाली आहे. ही मुलगी तालुक्यातील एका गावात राहते. व एका कॉलेज मध्ये 11 व्या वर्गा मध्ये शिक्षण घेत आहे.त्या मुलींच्या घरच्यांनी समाजात बदनामी होईल या भितीने आज पर्यंत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला नव्हता. ही घटना मारेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत श्रीरामपुर येथील गावाशेजारी असलेल्या संशियताच्या आजीच्या शेतात घडली.
याबाबत काल दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोज शनिवारला सायंकाळच्या सुमारास पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी संशियत आरोपी राजकुमार रामभाऊ मेश्राम वय सुमारे 23 वर्ष याच्यावर कलम- 376,376(1)(A),376(2)(J,N) 4,6 बाललैलिक अत्याचार (पोक्सो ) सह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस करत आहे.