गवारा गावात अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोकांची गर्दी.
ज्ञानेश्वर आवारी झरी (जामणी) तालुक्यातील गवारा येथील उपसरपंच प्रवीण नामदेवराव गुरनुले यांचे काल रात्री उपचारादरम्यान नागपुर येथे निधन झाले.
प्रवीण गुरनुले व त्यांचा मित्र रामेश्वर कनाके हे दोघे मित्र करंजी मार्गे आपल्या गावाकडे जात असतांना शनिवारी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास करंजी रोड वरील टोल नाक्या जवळ दुचाकीने जात असतांना हा अपघात झाला होता.त्यांना रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी लगेच पांडरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
त्यानंतर त्यांना यवतमाळ येथील खाजगी व सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते.पण येथील डॉक्टरांनी उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे स्थलांतरीत केले होते.आणि त्याला मेयो हॉस्पिटल मध्ये दाखल पण करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान काल रात्रीच्या सुमारास नागपुर येथे त्यांचा मृत्यू झाला.
तर रामेश्वर कनाके यांना डोक्याला व हाताला मार लागला असुन तो नागपूर येथे उपचार घेत आहे.प्रवीण हे उत्कृष्ट तबलावादक सुद्धा होते व सामाजिक कामात ते सदैव अग्रेसर राहायचे दि.13 फेब्रुवारीला त्यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ अहमदनगर द्वारा त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार सुद्धा देण्यात आला होता.आतापर्यंत अनेकदा त्यांनी रक्तदान करून रुग्णांना जीवनदान दिले.
कित्येकदा त्यांनी त्यांच्या खाजगी गाडीमध्ये रुग्णांना रात्री बे रात्री नेऊन मोफत रुग्णसेवा दिली.ते अखिल भारतीय माळी युवा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा होते.आणि गुरुदेव सेवा मंडळाचे चांगले प्रचारक व प्रसारक होते व ते ख्यातनाम तबला वादक होते त्यांनी झरी व पाटणबोरी विद्यार्थ्यांकरीता बस सेवा सुरू करण्याकरिता प्रयत्न केले होते.
तरुण सामजिक कार्यकर्ता प्रवीण गुरनुले यांच्या निधनाने गावासह तालुकात हळहळ व्यक्त केली जात असून गवारा गावात त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोकांची गर्दी झाली होती.प्रवीण यांच्या पश्चात आई-वडील,एक भाऊ असा आप्त परिवार आहे.