मार्डी येथे रंगला महिलांच्या नृत्याचा बहारदार कार्यक्रम.
नृत्याच्या तालावर महिलांचा विलोभनीय नृत्याविष्कार.
गजानन आसुटकर मारेगांव:-जनहित कल्याण महिला संघटना व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघटना मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मार्डी येथे सामूहिक महिला नृत्य स्पर्धेचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.

महिलांच्या बहारदार नृत्याने या कार्यक्रमात मोठी बहर आणली होती.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाने मार्डीकर तसेच परिसरातील जनतेला मंत्रमुग्ध केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने
दि.31 मार्च 2023 ला जनहित कल्याण संघटना मारेगावचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन जनहित कल्याण महिला संघटनेच्या सचिव सुवर्णाताई खामणकर,अध्यक्षस्थानी संघटनेच्या अध्यक्षा कविताताई मडावी,प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयाताई मोरे,वनविभाग कर्मचारी प्रेमीला सिडाम,मारेगावच्या माजी नगराध्यक्षा इंदुताई किन्हेकर, उपस्थित होत्या.

या स्पर्धेमध्ये एकूण 24 समूह नृत्य संघांनी सहभाग नोंदवला. सर्वच संघाच्या महिलांनी आपली कला बहारदारपणे सादर केली.चंद्रपूर,चिमूर,पांढरकवडा,मारेगाव अशा लांबून आलेल्या महिला नृत्य समूहानी आपल्या नृत्य कला अविष्काराने हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 25 हजार एक व स्मृतीचिन्ह जय अंबे महिला समूह ग्रुप मारेगाव,द्वितीय क्रमांक 17 हजार एक व स्मृतिचिन्ह नटराज समूह नृत्य ग्रुप चंद्रपूर,तृतीय क्रमांक 11 हजार एक व स्मृतिचिन्ह कण्यका समूह ग्रुप पांढरकवडा,तर दोन प्रोत्साहनपर 5 हजार एक आणि स्मृतिचिन्ह आदिशक्ती महिला ग्रुप मारेगाव आणि सावित्रीबाई समूह ग्रुप नवरगांव यांनी पटकावले. या नृत्यांनी एवढे मनोरंजन केले की नृत्य सुरु असतांना अनेकांनी या समूह नृत्य ग्रुपला वैयक्तिक बक्षीस दिले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनहित कल्याण महिला संघटना,जनहित कल्याण संघटना,आणि राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भास्करराव धानफुले, मोरेश्वरराव ठाकरे, सुमित हेपट माणिक कांबळे, भास्कर राऊत, सुरेश पाचभाई,सुरेश नाखले,भैय्याजी कनाके, गजानन देवाळकर, गजानन आसूटकर, आनंद नक्षणे, सुमित गेडाम,धनराज खंडरे, शरद खापणे,प्रफुल ठाकरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मार्डी तसेच परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.