स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या वतीने करण्यात आला कार्यक्रम.
गजानन आसुटकर मारेगांव,
स्वामी विवेकानंद अभ्यासिका मारेगाव येथे जिल्हा परिषद शिक्षक गजानन नरवाडे सर यांच्या बद्दली निमित्ताने स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या वतीने काल त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी मेश्राम सर (माध्यमिक शिक्षक) उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अभ्यासिकेचे आधारस्तंभ प्रविण खंडाळकर (माध्यमिक शिक्षक ,शासकीय आश्रम शाळा,जूनोणी) तसेच दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून बलकी सर लाभले होते.
स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून मारेगाव सारख्या आदिवासी बहुल व काही प्रमाणात इतर तालुक्याच्या तुलनेत मागास असलेल्या तालुक्यात स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्याना तयारी करावयाची असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी शिकवणी लावायला जावं लागतं असे.आणि ते सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तींना परवडणारे नव्हते.

याचाच सारासार विचार करून स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे मूळ खंडाळकर सरांनी मारेगाव येथे रोवली. मग याच शिकवणी वर्गाला कोणताही मोबदला न घेता विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षेचे धडे नरवाडे सरांनी दिले.वेळोवेळी अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याना परीक्षाभिमुक मार्गदर्शन सरांनी दिले.
खंडाळकर सरांनी आपल्या भाषणातून नरवाडे सरांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला.अध्यक्षीय भाषणातून मेश्राम सरांनी सुद्धा आपले अनुभव व्यक्त केले.तसेच बलकी सरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.तसेच प्रविण पोटे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या विद्यार्थांनी सुद्धा आपले सरांविषयी अनुभव व्यक्त केले.
त्यामध्ये संतोष कनाके,विलास गोवारकर,प्रफुल सुर,मिलिंद मनवर व कु.ययाती हे होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमित पोरटे सर (पदवीधर शिक्षक जि. प.नांदेड) यांनी केले तर प्रास्ताविक कुणाल बोरुले यांनी केले व आभार रोशन हेपट यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी उपस्थित होते.