26 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.

0
61

मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील घटना.

गजानन आसुटकर मारेगांव,

मारेगाव येथील एका 26 वर्षीय तरुनाणे राहत्या घरी गळफास घेत स्वतःची जीवन यात्रा संपविल्याची घटना आज दिनांक 15 जुन 2023 रोज गुरुवारला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास घडली.

शंकर कवडू गजभे वय सुमारे 26 वर्ष रा.मारेगाव (प्रभाग क्रमांक 12 ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो मारेगाव येथील धामणी रोड लगत पानटपरीचा व्यवसाय करायचा आज दिनांक 15 जून 2023 रोज गुरुवारला दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास शंकर याने स्वतःचे राहते घरी छताच्या लोखंडी अँगला नायलोन दोराच्या साह्याने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.

बातमी लिहेपर्यंत त्याच्या आत्महतेचे नेमके कारण कडु शकले नाही.शंकर यांचे पश्चात आई, वडील,भाऊ,वहिनी असा आप्त परिवार आहे.या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here