विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,
मारेगाव तालुक्यात एकामगोमाग होणाऱ्या आत्महत्यांचे सत्र संपतांना दिसत नाही.काही दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा आज सकाळी आत्महत्या झाल्याने तालुका पुरता हादरून गेलेला आहे.
प्रविण शायनिक काळे वय सुमारे 33 वर्ष असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून तो मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील राहिवासी होता.
प्रविण हा आपल्या कुटुंबा सोबत हिवरी येथे राहायचा.त्यांच्या कडे सुमारे 5 एकर शेती असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.तो शेती करुण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा परंतु आज दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोज बुधवारला सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास तो शेतात फवारणी करण्यासाठी गेला होता.
त्याने स्वतःच्या शेतात विषारी कीटक नाशक प्राशन केल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रविण याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रविण याचे पश्चात आई,वडील पत्नी,दोन मुल असा आप्त परिवार आहे.
मृत प्रवीण यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलल्याने हिवरी व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार जनार्धन खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार किसन संकुलवार करीत आहेत.