झरी तालुक्यात आणखी एका प्रेमीयुगुलाची आत्महत्या.

0
55

– आंब्याच्या झाडाला लावला गळफास.
– मार्थाजून जवळील वडगाव शिवारातील घटना.

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामनी एका विवाहित प्रेमीयुगुला घटना ताजी असताना आज तालुक्यातील मार्थाजून जवळील वडगाव शिवारामध्ये प्रेम युगलाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस घटनास्थळी पोहचले असता घटनास्थळी मदन मेश्राम यांचे वडगाव शिवारातील शेत गट क्र.१९१ या शेतातील आंब्याच्या झाडाला नायलॉन दोराने रोहित मदन मेश्राम वय अंदाजे २५ वर्षे व रंजना नंदू टेकाम वय अंदाजे १९ वर्षे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मृतक रोहित मदन मेश्राम व रंजना नंदू टेकाम या दोघांचेही प्रेम संबंध चार वर्षापासून सुरू होते.आता दोघांनीही टोकाचे पाऊल उचलून आंब्याच्या झाडाला गडफास घेऊन आत्महत्या केली असावी अंदाज आहे.पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून शवविच्छेदन करण्यास ग्रामीण रुग्णालय झरी येथे पाठवण्यात आले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शाखाली जमादार संदीप सोयाम,सचिन गाडगे,रतिष वानखडे करीत आहे. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here