हृदयविकाराच्या झटक्याने इसमाचा मृत्यू…!

0
69

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- हृदयविकाराच्या झटक्याने आज मार्की बु. गावातील संजय भाऊराव मांडवकर ४७ या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.संजय खाजगी कोळसा खाणीत काम करत असून नेहमी प्रमाणे कामावर जाण्याचा तयारी सुरू केली.सकाळी आंघोळ करून टावेल गुंडाळून जवळच्या कृषी सेवा केंद्रात जावून उभा असताना कस तरी वाटत अस दुकानदाराला सांगितले व घरी गेला.

घरी जावून तो जमिनीवर कोसळला.तेव्हा पत्नीने आरडा ओरड केला.ते ऐकून शेजारी लोक गोळा झाले.त्यांनी तात्काळ मुकुटबन येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आणले तेथील डॉक्टरने वणीच्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला.वणी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरने त्याला मृत घोषित केले.त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगी आहे.

संजय हाच कर्ता पुरुष असून त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आर्थिक आधार हरवला आहे.सगळ्याशी मिळून मिसळून वागणाऱ्या संजयच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.संजयच्या अंत्यसंस्कारासाठी असंख्य लोक हजर होते.त्याच्या अचानक जाण्याने मार्की गावावर शोककळा पसरली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here