सुरेश पाचभाई मारेगाव
जि. प.यवतमाळ, पं. स. तथा पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसद च्या संयुक्त विद्यमाने मारेगावात शाश्वत विकासाच्या सतरा ध्येय नऊ संकल्पना थीमची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजीत
या प्रशिक्षणात गाव स्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक सहभागी झाले होते.यामध्ये सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, मुख्याध्यापक,अंगणवाडी सेविका,आशासेविका,डाटा एंट्री ऑपरेटर्स,यांचा समावेश होता.
गरिबीमुक्त,उपजीविका पोषक गाव,आरोग्यदायी गाव,बालस्नेही,पंचायत जलसमृद्ध गाव,स्वच्छ गाव,हरित गाव,पायाभूत सुविधा युक्त गाव,सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव,सुप्रशासन युक्त गाव, महिला स्नेही गाव.आमचा गाव आमचा विकास,या शाश्वत विकासा बाबत जि.पी.डी.पी.च्या माध्यमातून थीमचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींधर आभाळे,पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अश्विन आडे,यांच्या मार्गदर्शना खाली तिन दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले.गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, देवानंद मुनेश्वर,माने,जाधव, महल्ले,विस्तार अधिकारी यांनी प्रशिक्षण स्थळी भेट दिली यावेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र पुसदचे निदेशक शरद वानखडे, राज्य प्रविण प्रशिक्षक सुभाष पवार,रिता ठवकर,अरुण कांबळे,मारोती पचभाई,मारोती वेलादे,या तज्ञा कडून मार्गदर्शन करण्यात आले.
ग्राम पंचायत ने शाश्वत विकासाची ध्येय साध्य केली तर सर्वांगीण विकासाचा पाया मजबूत होणार असल्यामुळे केंद्र शासनाने नियोजनबध्द कार्यक्रम हाती घेतला आहे.गावातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीला डोळयासमोर ठेवून राज्य शासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती सह स्थानिक ग्रामपंचायतीवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.कार्यक्रमाच्या अमलबजावणीसाठी 9 थीम तयार करण्यात आल्या आहे.