निसर्गाच्या सानिध्यात श्रीराम प्रभू चे मंदिर
सुरेश पाचभाई मारेगाव,
तालुक्यातील खडकी ( बुरांडा ) येथील राम मंदिरामध्ये भव्य पूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिरामध्ये मंत्रौपचाराने भगवान राम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मारेगाव तालुक्यातील खडकी (बुरांडा) येथील टेकडीवर श्री रामाचे मंदिर असून ते निसर्गरम्य वातावरणात आहे.या ठिकाणी गेल्या अनेक वर्षा आधी प्रभु श्री रामाने मुक्काम केल्याचे परिसरातील वृद्ध व्यक्ती सांगतात.

या ठिकाणी श्री रामाचे धणुष्यबान व चरणपादुका आहे.अयोध्यातील – नवनिर्मित प्रभु श्रीराम मंदिरात रामलल्ला यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे.

त्या अनुषंगाने खडकी येथील प्रभु श्रीरामच्या मंदिरात पूजा अर्चना कमिटी कडून भव्य पूजेचे आयोजन व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी परिसरातील रामभक्त तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते