हटवांजरी येथील जीवनविकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न

0
199

विद्यार्थ्यांनी परिसरातील रसिकांना केले मंत्रमुग्ध

सुरेश पाचभाई मारेगांव,
[9922862184]

मारेगांव तालुक्यातील हटवांजरी येथील जीवनविकास विद्यालयाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्नेहसंमेलन काल दिनांक 27 जानेवारी 2024 रोज शनिवारला सायकाळी 7 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यमाचे अध्यक्षस्थानी – कुंदनकुमार पु. महाजन (अध्यक्ष) जीवनविकास ब. सा. संस्था तर उद्घाटक स्वातीताई महाजन (संचालिका) जीवनविकास ब. सा. संस्था घाटंजी,प्रमुख अतिथी शेडमाके विस्तार अधिकारी मारेगाव, मनोज लांजेवार केंद्रप्रमुख हटवांजरी केंद्र,मोहनराव ठाकरे सर मुख्याध्यापक.जी.प.शाळा हटवांजरी,

मुकेश महाडूळे सर मुख्याध्यापक /प्राचार्य जीवनविकास विद्यालय हटवांजरी, सौं.प्रिया गणेश कुळमेथे सरपंच ग्रा.पं.हटवांजरी, निखिल कालेकर उपसरपंच, अनिरुद्ध माथनकर पोलीस पाटील हटवांजरी,सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा अविष्कार सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले.नृत्य,नकला,नाटक असे वेगवेगळे प्रकार सादर करीत मुलांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले.

या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here