पोलीस प्रशासनाची कारवाई
सुरेश पाचभाई मारेगांव,
मारेगाव: तालुक्यातील रेती घाटातुन अवैधपणे रेतीची मोठया प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरु आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहे.अशातच दी.13 फेब्रुवारी 2024 च्या रात्री पोलीस प्रशासनाने अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला आहे.या धडाकेबाज कारवाईने अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.

तालुक्यात होत असलेली रेतीची अवैध वाहतूक ही प्रशासनाला आव्हान ठरलेली आहे.अवैध रेतीची रात्र -दिवस वाहतूक सुरु असल्याच्या माहितीवरून मारेगांव पोलीसांनी दी.13 फेब्रुवारी 2024 च्या मध्य रात्री 1 वाजता दापोरा ते चिंचमंडळ परिसरात ट्रॅप रचला. यात एक व्यक्ती ट्रॅक्टरने रेतीची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्याने लगेच मारेगाव पोलिस चिंचमंडळ येथे रवाना झाले.

त्यांना चिंचमंडळ ते दापोरा येथे वाळू ची अवैध वाहतूक करणारा MH-30-AB-6686 एक ट्रॅक्टरच्या मुंडक्याच्या नंबर आहे ट्रॉलीवर नंबर नाही असे वाहन पोलीस प्रशासनाने पकडले असून ज्ञानेश्वर भगवान नारनवरे राहणार खैरी ता.राळेगाव अशी जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर मालकांचे नाव असून सदर ट्रॅक्टर मारेगाव येथील पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.सदरची कारवाई मारेगाव येथील पोलीस विभागाचे ए.एस.आय प्रमोद जिड्डेवार, पो.हे.का रजनीकांत शंकर पाटील यांनी केली.